कॅरोलिना प्लिस्कोवाला युलियाने नमविले
मेलबर्न : एटीपी रॅंकिंगमध्ये पहिल्या स्थानी असलेल्या स्पेनच्या राफेल नदालचे ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील आव्हान चौथ्या फेरीत संपुष्टात आले आहे. ऑस्ट्रेलियाच्या निक किर्ग्योस याने पाच सेटपर्यंत रंगलेल्या संर्घषपूर्ण सामन्यात पराभव केला.
दुसरीकडे जागतिक क्रमवारी दुसऱ्या क्रमांकावर असलेली कॅरोलिना प्लिस्कोवाला पराभवाचा सामना करावा लागला. मेलबर्न येथील घरच्या मैदानावर प्रेक्षकांच्या मिळालेल्या पाठिंब्याच्या मदतीने ऑस्ट्रेलियाच्या निक किर्ग्योस याने राफेल नदालला कडवी झुंज दिली. किर्ग्योसने हा सामना 6-2, 7-6 (7/5), 6-7 (6/8), 6-7 (7/9), 7-6 (10/8) असा जिंकला. हा सामना तब्बल 4 तास 25 मिनिटांपर्यत रंगला. दरम्यान, तिसऱ्या फेरीत नदालने आपल्याच देशाच्या पॉब्लो बुस्टा याचा 6-1, 6-2, 6-4 असा सहज पराभव करत चौथ्या फेरीत प्रवेश केला होता.
रॉजर फेडररने अजिंक्यपदाच्या आशा कायम ठेवत पाच सेटपर्यंत चाललेल्या सामन्यात जॉन मिलमनवर विजय मिळवित आगेकूच केली. हा सामना फेडररने 4-6, 7-6 (7/2), 6-4, 4-6, 7-6 (10/8) असा जिंकला. महिला एकेरीत रशियाच्या अनेस्टासिया पॉल्यूचेंकोवाने धक्कादायक निकाल नोंदवित कॅरोलिना प्लिस्कोवाला पराभूत केले.
पॉल्यूचेंकोवाने 2 तास 25 मिनिटे रंगलेल्या संघर्षपूर्ण सामन्यात 7-6(7/4), 7-6 (7/3) असा विजय मिळविला. आता पॉल्यूचेंकोवाचा पुढील फेरीत जर्मनीच्या अँजेलिक केर्बरशी सामना होणार आहे. दरम्यान, शुक्रवारी अमेरिकेच्या सेरेना विल्यम्स आणि गतविजेती नाओमी ओसाकाला पराभवाचा सामना करावा लागला होता. शनिवारी खेळल्या गेलेल्या अन्य महिला एकेरी गटात चौथ्या मानांकित रोमानियाच्या सिमोना हलेपला कझाकस्तानच्या युलिया पुतिन्त्सेवाने एक तास 18 मिनिटांच्या सामन्यात 6-1, 6-4 ने पराभूत केले.