Maharashtra Politics : शिवशक्ती-भिमशक्ती एकत्र येणार! शिवसेना ठाकरे गटासोबतच्या युतीसाठी वंचित तयार, पण…

Updated On:

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत युती होण्याच्या चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. प्रकाश आंबेडकरांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेकडे युतीचा प्रस्तावदेखील दिला मात्र, शिवसेनेने या प्रस्तावावर कोणतेही भाष्य केलेले नव्हते. दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा शिवशक्ती-भिमशक्तीचा प्रयोग पहायला मिळणार आहे. लवकरच महाराष्ट्रात नवी युती पहायला मिळणार आहे. राज्यात पुन्हा एकदा शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. वंचित बहुजन आघाडीने शिवसेना ठाकरे गटासोबत युती करण्याची घोषणा केली आहे. वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी आज पत्रकार परिषदेत याची माहिती दिली.

उद्धव ठाकरे गटातील नेते सुभाष देसाई यांच्याशी दोन बैठका झाल्या असून आम्ही उद्धव ठाकरे गटाशी युती करण्यास तयार आहोत, असे रेखा ठाकूर यांनी सांगितले आहे. प्रकाश आंबेडकर आणि ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांच्यात युतीबाबत चर्चा झाल्याची माहिती वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी दिलीय. या बैठकीत वंचितने सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं सांगण्यात आले. मात्र, वंचित बहुजन आघाडी केवळ शिवसेनेसोबत युती करणार की मविआचा घटक होणार याबाबत स्पष्टता आल्यानंतर पुढचा निर्णय घेण्यात येणार असल्याचं ठाकूर यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडी मविआचा भाग होणार की फक्त शिवसेना-ठाकरे गटासोबत युतीयाबाबत अंतिम निर्णय ठाकरे घेणार आहेत.

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्र विकास आघाडीत समाविष्ट करून चार पक्षीय आघाडीतून निवडणूक लढवणार की शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच निवडणूक लढवणार हे शिवसेनेने स्पष्ट करावे अशी मागणीदेखील वंचितकडून करण्यात आली आहे. या बाबतीतला निर्णय त्यांच्याकडून समजला की पुढच्या टप्प्याची चर्चा सुरु होईल असेही रेखा ठाकूर यांनी म्हटले. त्यामुळे आता वंचितने आता युतीबाबतच्या निर्णयाचा चेंडू शिवसेनेच्या कोर्टात गेला आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युतीसंदर्भात चर्चा सुरू होती. मुंबईतील प्रबोधनकार डॉट कॉम या संकेतस्थळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर एका मंचावर आल्या होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना ठाकरे गटासोबतच्या युतीबाबत सकारात्मक संकेत दिले होते. त्यानंतर ही युती होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात होती. असे असताना आता वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या रेखा ठाकूर यांनी ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युतीसंदर्भात मोठी माहिती दिली आहे.

राज्यात जुळणार नवीन राजकीय समीकरणं?; उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर येणार एकाच मंचावर एकत्र

यानंतर राजकीय वर्तुळात शिवशक्ती आणि भीमशक्ती पुन्हा एकत्र येतील का ? आले तर वंचित बहुजन आघाडी केवळ शिवसेनेसोबत युती करणार की मविआचा घटक होणार याबाबत तर्क-वितर्कांना सुरूवात झाली आहे. तसेच शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीमुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Vitthal Langhe : नेवाशाच्या विकासासाठी आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील आक्रमक; एकाच दिवशी पाच मंत्र्यांशी थेट चर्चा!

2026-10-06 21:59:12

Vitthal Langhe : नेवाशाच्या विकासासाठी आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील आक्रमक; एकाच दिवशी पाच मंत्र्यांशी थेट चर्चा!

Shiv Sena Case Hearing : शिवसेना पक्षाच्या सुनावणी दरम्यान मोठा ट्विस्ट ! सुप्रीम कोर्टाचा 'तो' एक प्रश्न; नेमकी कुणाची होणार कोंडी?

2026-10-06 16:11:16

Shiv Sena Case Hearing : शिवसेना पक्षाच्या सुनावणी दरम्यान मोठा ट्विस्ट ! सुप्रीम कोर्टाचा 'तो' एक प्रश्न; नेमकी कुणाची होणार कोंडी?

Sanjay Shirsat : झकमारी केली अन् मंत्री झालो; 'या' नेत्याच्या विधानाने उडाली खळबळ

2026-10-05 18:22:37

Sanjay Shirsat : झकमारी केली अन् मंत्री झालो; 'या' नेत्याच्या विधानाने उडाली खळबळ

Newasa News : विखे विरुद्ध थोरात संघर्ष थांबणार? अहिल्यानगर जिल्हा बँकेत 'हे' नेते ठरणार किंगमेकर

2026-10-05 17:12:54

Newasa News : विखे विरुद्ध थोरात संघर्ष थांबणार? अहिल्यानगर जिल्हा बँकेत 'हे' नेते ठरणार किंगमेकर

Top 10 News : विधानपरिषदेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर ते ठाकरे बंधूंचा सरकारवर घणाघात..; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या

2026-10-04 18:56:41

Top 10 News : विधानपरिषदेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर ते ठाकरे बंधूंचा सरकारवर घणाघात..; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या