मुंबई – दाक्षिणात्य कलाविश्वाचे सुपरस्टार ‘मोहनलाल’ आज आपला 60 वा वाढदिवस साजरा करत आहेत. केरळमध्ये आपल्या कुटुंबासोबत त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला. दरम्यान, आपल्या जन्म दिवसाचे औचित्य साधत त्यांनी चाहत्यांना एक मोठं गिफ्ट दिलं आहे.
मोहनलाल यांनी आपल्या आगामी ‘दृश्यम 2’ चित्रपटाची अधिकृत घोषणा केली आहे. 2013 साली या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. आज मोहनलाल यांनी सोशल मीडियावर ‘दृश्यम 2’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केलं आहे. या चित्रपटाचा टीझर 20 सेकेंदांचा आहे.
#Drishyam #Drishyam2 pic.twitter.com/OHnue7P5uw
— Mohanlal (@Mohanlal) May 21, 2020
एंटनी पेरुमबवूर हे ‘दृश्यम 2’ चित्रपटाची निर्मिती करणार आहेत तर दिग्दर्शक जेथु जोसफ यांच्या खांद्यावर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी असणार आहे. ‘दृश्यम 2’ चित्रपटामध्ये मोहनलाल जोर्गेकुटी ही व्यक्तीरेखा साकारताना दिसणार आहेत. त्यामुळे हा चित्रपट सर्वांसाठी एक उत्तम मेजवानी ठरणार हे नक्कीच.