मेलबर्न :- ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनाऱ्यावर अवकाशयानाच्या रॉकेटच्या आवरणासारखी एक गूढ वस्तू वहात येऊन पडली आहे. ही वस्तू म्हणजे रॉकेटच्या मोटरचे आवरण असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
पश्चिम किनारपट्टीवर सापडलेली ही वस्तू पोलिसांनी सुरक्षित ठिकाणी हलवली आहे. ऑस्ट्रेलियातील पर्थ शहरापासून 250 किलोमीटर अंतरावर पश्चिमेकडील ग्रीन हेड येथील दुर्गम किनारपट्टीवर शनिवारी संध्याकाळी ही वस्तू येऊन पडली होती.
ही वस्तू म्हणजे भारतीय अंतराळ यानाच्या मोटरचे अवरण असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
उपग्रहाच्या प्रक्षेपणानंतर हे आवरण अवकाश यानापासून वेगळे झाले असावे आणि समुद्रात पडले असावे. या वस्तूबद्दल भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात “इस्रो’ ऑस्ट्रेलियाच्या अवकाश संस्थेशी संपर्क साधून अधिक माहिती घेत आहे.