Sankarshan karhade: अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (sankarshan karhade) सोशल मीडियावर सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. अनेकदा तो त्याच्या वैयक्तिक आणि कामाबद्दलच्या अपडेट शेअर करताना दिसतो. नुकतेच त्याने कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदिराचे दर्शन घेतले होते. त्यानंतर त्याने तेथील काही अनुभव चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केला आहे.
संकर्षण कऱ्हाडे पोस्ट –
संकर्षण पोस्टमध्ये म्हणाला, ‘सुप्रभात..आज पहाटे २.३० पासुनचा अनुभव.. कार्तिक मासामध्ये महालक्ष्मी देवीच्या अंबाबाईच्या नित्योपचारात बदल होतो. पहाटे २.३० वा. मंदिर उघडते आणि काकडा सुरू होतो. मशाल घेउन देवीच्या कळसापासून कापूर लावण्यास सुरवात होते, ते गाभाऱ्यातल्या जवळपास १५० मंदिरांच्या ठिकाणी कापूर प्रज्वलीत केला जातो. पहाटे ३ / ३.३० वा. सगळा परिसर कापूराच्या ज्योतीने ऊजळेला पाहून काय प्रसन्न वाटत होतं. त्यात हे सगळं सनईच्या गोड आवाजात’.
View this post on Instagram
पुढे तो म्हणाला, ‘हे करता करता देवीसमोरचं दार म्हणजे मुख्य गर्भगृह उघडलं जातं आणि देवीला “ऊठ ऊठ माते अरुणोदय झाला” अशी साद घालत जागं केलं जातं देवीची काकडा आरती केली जाते. काल सांगलीचा रात्रीचा प्रयोग करून मी पहाटे २.३० वा. मंदिरात आलो हा सगळा सोहळा मला पहिल्यांदाच पहाता आला… अनुभवता आला…. आणि तुम्हाला सांगतो देवीच्या पायावर डोकं ठेउन दर्शन घेता आलं” काय सांगावं कसं वाटलं.. माझे डोळे सतत भरून येत होते.. मनांत काय भाव आले हे सांगताच येणार नाही असा हा अनुभव होता’, असे तो म्हणाला.
दरम्यान, संकर्षणने मालिका, चित्रपट, नाटक या सर्व क्षेत्रात काम केले आहे. सध्या संकर्षणचे ‘नियम व अटी लागू’ आणि ‘तू म्हणशील तसं’ हे दोन्ही नाटकं जोरात सुरु आहेत. याशिवाय त्याचा तीन अडकून सीताराम’ हा चित्रपटही नुकताच रिलीज झाला आहे.