मुस्लिमांची पुरातत्व विभागावरही टीका
नवी दिल्ली : अयोध्यामधील वादग्रस्त जागेच्या बाह्य प्रांगणातील राम चबूतरा हा भगवान राम यांचे जन्मस्थान असल्याचे आपले म्हणणे मुस्लिम पक्षांनी बुधवारी सर्वोच्च न्यायलयात मागे घेतले. भारतीय पुरातत्व विभागाच्या अहवालानुसार ही रचना बाबरी मशिदीच्याही पूर्वी अस्तित्त्वात असल्याचे सूचित केले होते. त्या अहवालावरही मुस्लिम बाजूंक्डून जोरदार टीका करण्यात आली.
वादग्रस्त 2.77 एकर जमीन भगवान रामाचे जन्मस्थान असल्याचे सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा नाही, या त्यांच्या भूमिकेमध्ये कोणताही बदल झालेला नाही, असेच आज मुस्लिम बाजूंकडून सर्वोच्च न्यायालयात सांगितले गेले. फैजाबाद जिल्हा न्यायालयाच्या 18 मे 1886 च्या आदेशाला मुस्लिम पक्षांनी आव्हान दिले नाही, एवढेच आपल्या निवेदनाचातून म्हणायचे असल्याचे सांगितले.
2003 च्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अहवालामध्ये बाबरी-मशिदीच्या आधीच्या संरचनेचे अस्तित्व दर्शविणारे अवशेष, मूर्ती आणि कलाकृती सापडल्या असल्याचा उल्लेख आहे. मात्र यातून कोणताही निष्कर्ष निघत नसून मुख्यतः निर्देशांवर आधारित निरीक्षण मांडत आहे, असे म्हटले होते. अहवालावरही मुस्लिम पक्षांनी हल्ला चढविला,
तथापि, पुरातत्व विभागाच्या अहवालावर काही आक्षेप असल्यास, कायद्यानुसार कायदेशीर उपाय उपलब्ध असल्याचे न्यायालयाने सांगितले. जे काही आपले आक्षेप असू शकतात, ते कदाचित तीव्र असू शकतात परंतु त्यावर आम्ही काहीही करू शकत नाही, असे मत मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील न्यायाधीशांच्या घटना पीठाने सांगितले.