सूरत : सईद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मनीष पांडेच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर कर्नाटकने तामिळनाडूसमोर विजयासाठी १८१ धावांचे आव्हान ठेवले आहे.
Karnataka posted on 180 for 5 in 20 overs against Tamil Nadu in the Mushtaq Ali final.
Manish Pandey: 60*(45)
Ravichandran Ashwin: 4-0-34-2
Murugan Ashwin: 3-0-33-2#MushtaqAliT20 #PattaiyaKelappu— ChepaukSuperGillies (@supergillies) December 1, 2019
तामिळनाडूने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण स्विकारत कर्नाटकला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. प्रथम फलंदाजी करताना कर्नाटकने २० षटकांत ५ बाद १८० अशी मजल मारली. कर्नाटककडून मनीष पांडेने ४५ चेंडूत सर्वाधिक ६० धावा केल्या तर करूण नायरने ८ चेंडूत १७ धावा केल्या.
तामिळनाडूकडून गोलंदाजीत रवीचंद्रन अश्विनने ४ षटकांत ३४ धावा देत २ गडी बाद केले तर मुर्गन अश्विनने ३ षटकांत ३३ धावा देत २ गडी बाद केले.