रत्नागिरी – दापोली तालुक्यातील वनोशी खोतवाडीत एका घरात तीन महिलांचे रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या तीनही महिला अतिशय वृद्ध आहेत.
या तीनही मृतदेहांवर ऍसिड आणि पाण्याचे द्राव्य असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. विशेष म्हणजे तीनही महिलांचे मृतदेह हे घरातील वेगवेगळ्या खोलीत आढळले आहेत.
एका महिलेचा मृतदेह हा घराच्या पहिल्या खोलीत आहे. दुसरा मृतदेह हा बेडरुम, तर तिसरा मृतदेह हा किचनमध्ये आढळलेला आहे. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.