Pune Murder News – पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरात अप्पर डेपाे वसाहत याठिकाणी बाळासाहेब ओसवाल यांच्या नवीन बांधकामाच्या इमारतीतील गाळ्याच्या कामाच्या साईटवर एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याचा प्रकार साेमवारी उघडकीस आला आहे.
याप्रकरणी मृताची ओळख पटविण्याचे काम पाेलीस करत आहे. नेमका खून काेणी केला व काेणत्या कारणास्तव केला याचा अद्याप उलगडा झालेला नाही.