कैरो: पिरॅमिड आणि ममीचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इजिप्तमध्ये सतत कुठे ना कोठे ममी सापडत असतात. नुकतेच सुरू असलेल्या एका खोदकामांमध्ये एका स्त्रीची आणि पुरुषाची ममी वेगवेगळ्या ठिकाणी सापडल्या असून या दोन्ही ममीमध्ये सोन्याची जीभ आढळून आली आहे.
बऱ्यापैकी सुस्थितीत असलेल्या या स्त्री आणि पुरुषाच्या मम्मीच्या तोंडामध्ये जिभेच्या जागी एक सोन्याची प्लेट असून तिचा आकार जिभेसारखा आहे. युनिव्हर्सिटी ऑफ बारसिलोनातील संशोधकांनी हा शोध लावला आहे. पुरुष ममीच्या तुलनेत स्त्री ममीची अवस्था खराब असल्याने ज्या कबरीमध्ये या ममी ठेवण्यात आल्या होत्या त्यापैकी पुरुषाची ममी गेली अडीच हजार वर्ष आहे तशीच होती.
पण स्त्रीची कबर कोणी उघडून त्यातील दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू पळवल्या असाव्यात त्यामुळे स्त्रीच्या ममीची अवस्था जरा खराब झाली आहे. संशोधकानी दिलेल्या माहितीप्रमाणे, इजिप्तमधील सव्विसाव्या वंशातील राजघराण्यातील ही कबर असून त्याच राजघराण्यातील कोणातरी महत्वाच्या व्यक्तीची ही ममी असावी.
साधारणपणे इजिप्तमध्ये अंत्यसंस्काराच्यावेळी जीभेच्या ठिकाणी सोन्याची पट्टी किंवा प्लेट ठेवण्याची प्रथा होती. खोद कामांमध्ये संशोधकांना पुरुष ममी ज्या कबरीमध्ये होती त्या ठिकाणी आणखीन काही मौल्यवान वस्तूही सापडल्या असून त्या सर्व वस्तूही सुस्थितीत आहेत. त्यामुळे ही कबर गेली अडीच हजार वर्षे खोदण्यात आली नव्हती असा दावा संशोधकांनी केला आहे.
मधे स्त्रीची ममी असलेली कबर काही कारणाने उघडण्यात आल्याने त्याचा फटका आतील ममीला स्त्री आणि पुरुष यांच्या ममी ज्या ठिकाणी सापडल्या. त्या कबरी दगड कोरून तयार करण्यात आल्या होत्या. म्हणजे जमिनीत खोदून कबर तयार करण्यात आली नव्हती. तर एक मोठा दगड कोरून त्यातच या दोन्ही मृतदेहांचे दफन करण्यात आले होते.