नवी दिल्ली- भारतातील ओमायक्रॉन बाधितांची एकूण संख्या आता 45 झाली आहे. पूर्वीप्रमाणेच महाराष्ट्रात सर्वाधिक संसर्ग होताना दिसत आहेत. दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक बाधित राज्य राजस्थान आहे. आरोग्य विभागाने लोकांना सतर्क राहून करोना प्रोटोकॉलचे पालन करण्यास सांगितले आहे. असे असताना राजधानी दिल्ली मध्ये ओमायक्रॉनचे चार नवीन रुग्ण मिळाले आहेत.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज ओमायक्रॉनची चार नवीन प्रकरणे समोर आली आहेत. दिल्लीतील एकूण बाधितांची संख्या सहा झाली आहे. सहा रुग्णांपैकी एका रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी ही माहिती दिली आहे.