ठाणे : – मुंबईतील मीरा-भाईंदर महापालिकेच्या दोन अभियंत्यांनी आमदार गीता जैन यांच्याविरोधात बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली.
या तक्रारीत त्यांच्यावर मारहाण आणि कर्तव्यात अडथळा आणल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अपक्ष आमदार जैन यांनी कनिष्ठ अभियंता शुभम पाटील यांना चापट मारल्याचा आणि त्यांचे सहकारी संजय सोनी यांना बेकायदेशीर झोपडपट्टी पाडल्याचा आरोप करत शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ मंगळवारी व्हायरल झाला होता.
दरम्यान, या प्रकरणी अद्याप कोणतीही प्राथमिक माहिती नोंदवण्यात आलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले.