मुंबई : मुंबईतील वांद्रेपरिसरात एका इमारतीचा भाग कोसळला आहे. यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले आहे. सध्या जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ( Live Update)
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे परिसरात बेहराम पाडा परिसरात चार मजली रझाक चाळ आहे. काल (रविवारी 6 जून) रात्री 2 च्या सुमारास या 4 मजली इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळला.
या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत. सध्या जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
Maharashtra | One died, four persons injured after part of a building collapsed in the Bandra area of Mumbai. The injured have been admitted to a hospital. Officials of fire and police department present at the spot, says Congress MLA Zeeshan Siddique pic.twitter.com/F0Q0vB7GCr
— ANI (@ANI) June 7, 2021
सद्यस्थितीत घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. या ठिकाणी सध्या अग्निशमन दलाचे जवान, स्थानिक पोलीस उपस्थित आहेत.