कानठळ्या बसवणारे ध्वनी प्रदूषण आणि समाजभान

पुणे – एक अनुभव मुद्दाम सांगावासा वाटतो. ध्वनिप्रदूषणा(Noise pollution)च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मी पुण्याच्या माजी आयुक्‍त मीरा बोरवणकर यांना अर्ज करून भेटले होते. त्यावेळी त्यांनी सर्व सहाय्यक पोलीस आयुक्‍तांची मीटिंग घेतली. त्या मीटिंगमध्ये डॉक्‍टर म्हणून मी सर्व त्रास, उपाययोजना नियम वगैरे सर्व सांगितले. शांतता विभागानुसार ध्वनीची मर्यादा 50 डेसिबल असते. घरगुती 55 डी.बी., व्यापारी क्षेत्रात 65 डी.बी, असे मी सांगितले. तसे डेसिबल मीटरने मोजूनही दाखवले. तेव्हा तेथील उच्च पदस्थाने मला प्रश्‍न केला की मॅडम आपण ही ध्वनिप्रदूषणाची मर्यादा वाढवू या का म्हणजे ध्वनिप्रदूषण नाही असेच होईल.

यावर पोलीस असून ध्वनिप्रदूषणा(Noise pollution)विषयी एसीपी कक्षेतील उच्चपदस्थिताला अज्ञान होते. याचे मला प्रचंड आश्‍चर्य वाटले. तेव्हा या पातळी जागतिक आरोग्य संघटनेने ठरविल्या आहेत. त्याही अभ्यास करून यात तुम्ही-मी काही बदल करू शकत नाही. असे मी पोलिसांना सांगितले. पोलिसात जर इतके अज्ञान तर सामान्यांचे काय? तेव्हापासून मी ध्वनिप्रदूषणा(Noise pollution)विषयी जागृती करण्यासाठी प्रयत्न करत आहे. सातत्याने करूनही यश नाहीच परंतु दु:खात सुख इतकेच की 100 नंबरला फोन केला तर जवळच्या पोलीस स्टेशनवरून पोलीस येतात आणि आवाज कमी करण्याच्या सूचना देतात. ग्रामीण भागात कोणताच कायदा नियम पाळणे हे त्यांच्या मानसिकतेत नसते.

मग आम्ही देवाचं करतोय, सण साजरा करतोय, वराती काढल्या नाहीत तर लग्न झालयं हे कळणार कसं? असे प्रश्‍न विचारले जातात. सकाळी 6 पासून (पुण्यातही) अनेक धार्मिक स्थळी गाणी आणि इतर बाबी मोठ्याने लावल्या जातात. नागरिकांना(Ears)ही याची सवय झाली आहे. यासंदर्भातील जागृत डॉक्‍टरांनी कितीही वेळा लेखी तक्रारी केल्या तरीही ग्रामीण पोलीस काहीही करत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. आम्हाला डेसिबिलटमीटर दिलेली नाहीत मग कसे मोजणार? वगैरे प्रश्‍न उपस्थित केले जातात. यासाठी नियम आहे. परवाच न्या. अभय ओक यांचे विधान धर्मापेक्षा कायदा मोठा ध्वनिप्रदूषणा(Noise pollution)चा नियम सर्वांनाच पाळावा लागेल, असे होते. यावरून तरी आपल्याला हे लक्षात येणे अपेक्षित आहे.

कायदा सांगतो –
देवळामध्ये, मशिदीत इतर धार्मिक स्थळी 8 फुट पेक्षा जास्त उंचीवर ध्वनिक्षेपक लावता येणार नाही.
ध्वनिक्षेपकाची दिशा बाहेर नसावी.

ध्वनिक्षेपकाची दिशा इच्छुक भाविक जिथे भक्‍तिभावाने येतात त्या ठिकाणाच्या मध्यभागी आवाज जाईल अशा प्रकारे करावी.

त्या ठिकाणचा आवाज बाहेरच्या कोणत्याही माणसांना त्रासदायक पद्धतीने म्हणजेच ध्वनिप्रदूषण होईल असा जाणार नाही. हा दिल्ली उच्च न्यायालयाचा 6/1/2012 चा निकाल आहे. परंतु याची माहिती ना पोलिसांना आहे ना नागरिकांना(Ears). तेव्हा यासंदर्भात जागृती आवश्‍यक आहे. इतरांना त्रास होईल यापद्धतीने केलेली कोणतीही श्रद्धा सार्थ ठरणार नाही हे ही तेवढेच खरे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

ध्वनिप्रदूषणा(Noise pollution)चे दुष्परिणाम –
बहिरेपणा,तात्पुरता किंवा कायमचा
रागीट, संतापी व्यक्‍तिमत्त्व होते
चिडचिडेपणा वाढतो
डोकेदुखी
मळमळ
एकाग्रता भंग पावते, होतच नाही
पचनशक्‍तीवर परिणाम संभवतो
रक्‍तदाब वाढतो
प्रतिकार शक्‍ती कमी होते
160-180 डेसिबल आवाजाने मृत्यूही येऊ शकतो
अकाली वृद्धत्व – एक संशोधन
कोंडब्यांनी अंडी देणे बंद केले
दुभत्या जनावरांमधील दुधात घट झाली परंतु सुयोग्य शास्त्रीय संगीत ऐकवले तर वाढही झाली
गोंगाटामुळे शहरी मुली लवकरच वयात येतात
विमानतळाजवळच्या नागरिकांच्या मुलांची भाषेची वाढ कमी होताना दिसते. बुद्ध्यांक कमी होतो.

तरतुदी (Provisions) –
खासगी, शासकीय रुग्णालये, संस्था, न्यायालये यापासून 100 मीटर (300 फूट) पर्यंतचे क्षेत्र शांतता क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.
शांतता विभागात ध्वनीवर्धकास पूर्णबंदी असते.
रहिवासी/ व्यापारी/ औद्योगिक विभागात रात्री 10ते 6 ध्वनीवर्धकावर पूर्णबंदी
पोलीस यंत्रणेने स्वत:च सतर्क राहणे त्यांचे कर्तव्य आहे. परंतु यावरील तक्रारीवरील तात्काळ दखल घेऊन कार्यवाही करणे बंधनकारक आहे.

महत्त्वाची टीप (Important note) – 

ईअर फोन हा खरं तर आजच्या तरुणाईच्या दैनंदिन गरजेचा एक घटक बनला आहे. चालताना, गाडीवर असताना अथवा इतर वेळेसही हा ईअर फोन काना(Ears)त नसेल तर त्यांना अगदी चुकल्यासारखे होते. इथूनच खरी सुरूवात होते ध्वनीप्रदुषणाची. कानात (Ears) घातलेला तो ईअर फोन आणि त्याचा आवाज याने तुमच्या पूर्ण कानांचा ताबा घेतलेला असतो.

काना(Ears)त घालून गाणी ऐकताना तो आवाज शेजारी असणाऱ्यालाही ऐकू येईल इतकाही तो बऱ्याचदा मोठा असतो. आपण ऐकत असलेल्या ईअर फोनमधून येणारा आवाज जर शेजारच्याला ऐकू आला तर तो 80 डी.बी. चा असतो. असा आवाज सतत काना(Ears)वर पडला तर बहिरेपणा येतो. हे इअरफोन सतत कानावर ठेवणाऱ्यांनी लक्षात ठेवावे.

लहान मुलांच्या काना(Ears)जवळ मोबाईल/फोनचा रिसिव्हर नेऊ नये. लहान मुलांच्या काना(Ears)चा पडदा नाजूक असतो. मोठ्या आवाजाने तो फाटू शकतो. अशाने बहिरेपणा येऊ शकतो. भारतात आवाज केला तरंच सण साजरा केल्यासारखे वाटते. आवाज करून आनंद व्यक्‍त करणे ही खरं तर पशूंची पद्धती. ती अवलंबणारे अर्थातच पशूमानव. त्यामुळे त्यांना कळते ती भाषा रंगाची, शिक्षेची. परंतु सण-उत्सवांच्या काळात तीच माणसे कित्येक वर्षे कायदापालन कधीच करीत नाहीत.

त्यांना शिक्षा झाल्याचे आजवर ऐकिवात नाही. पोलीस हे, राजकीय पुढारी यांचे साटेलोटे असल्यावर सामान्य नागरिकांना(Ears) याबाबतीत कायदा करूनही न्याय मिळेल हे संभवनीय नाही. तरीही प्रत्येक नागरिकाने जागृत राहिले, कायदा पाळण्याचा आग्रह धरला तर कदाचित कालांतराने ध्वनीप्रदूषण कमी होईल.

या सर्व प्रकारात आणखी एका नियमाची भर पडली ती 24 तास दुकाने मॉल बाजारपेठा उघड्या ठेवण्याच्या निर्णयाची. मग लोकांच्या झोपेचे खोबरे झाले तरी चालेल. कायदा सोडला तरी चालेल परंतु उद्योगाला चालना मिळायला हवी. व्यापार वाढायला हवा. पेशंट वाढले नाहीत तर डॉक्‍टर्स जगणार कसे? मग ध्वनीप्रदूषण कायदा काहीही सांगो. आम्ही दुट्टपी वागणार का तर पैसा हवा म्हणून. ही मनोवृत्ती आजकाल सर्वांचीच असल्याचे दिसून येते.

तेव्हा नागरिकांनो जागृत व्हा. एखादा दिवस शांत नीरव परिसर शोधून काढा. शांततेचा अनुभव घ्या. तुमचे डोक शांत राहिल. चित्त स्वस्थ राहील. बुद्धीला चालना मिळेल. आपल्या टीव्हीचा म्युझिक सिस्टिमचा, मोबाईलचा आवाज कमीत कमी ठेवा. आपण किती मोठ्याने बोलतो, आपण वापरत असलेल्या यंत्रांचा किती आवाज होतो, यासाठी डेसिबल मीटरने आवाज मोजा. 100 पैकी 90 टक्के लोक एरवीही शेजाऱ्याला ध्वनिप्रदूषणा(Noise pollution)चा त्रास होईल असे वागत असतील असे तुमच्या लक्षात येईल.

तेव्हा शांत राहा आणि इतरांनाही शांतता देण्याचा प्रयत्न करा. थोडा विचार करा. बाहेरच्या आवाजापेक्षा आतला आवाज ऐका. 24 तास दुकाने उघडी ठेवणाऱ्या व शांतता भंग करणाऱ्या तसेच ध्वनिप्रदूषण होणाऱ्या प्रस्तावाला कडाडून विरोध करा.

विशेषतः ज्याचा त्रास सण-उत्सवकाळात जास्त होतो अशा उत्सवात होणारे ध्वनिप्रदूषण थांबवण्यासाठी 100 नंबरला फोन करा. किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला फोन करा. लेखी तक्रार द्या/ पाठपुरावा करा/यश येईल, शांततेने जगता येईल. अजून किमान 1-2 पिढ्यातच हा त्रास कायमचा संपेल कारण तोपर्यंत भारतीय माणसे ठार बहिरी झालेली असतील.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.