कान्हे, (वार्ताहर) – ग्रुप ग्रामपंचायत कान्हे येथील आंबेवाडीमधील बहुउद्देशीय सभागृह, तळे सुशोभीकरण व शिवस्मारक पुतळ्याचे भूमिपूजन करण्यात आले होते.
या वेळी आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमास ठाणे गावचे सरपंच विजय सातकर, उपसरपंच सुजाता चोपडे, गिरीश सातकर, महेश सातकर, अश्विनी शिंदे, अशा सातकर, रूपाली कुटे, मनीषा ओव्हाळ, सोपान धिंदळे, किशोर सातकर, सोनाली सातकर, बाबाजी चोपडी, संदीप ओव्हाळ, आरिफ मुलाणी, रोहिणी चोपडे, पूजा चोपडे, मयुर ढोरे, किशोर सातकर, संदीप आंद्रे, प्रकाश आगळमे आदी उपस्थित होते.
शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ फूट उंचीच्या अश्वरूढ पुतळ्याचे शिवस्मारक तसेच तलावाच्या २० गुंठे जागेमध्ये सुशोभिकरण मावळ तालुक्यात प्रथमच कान्हे गावामध्ये होत आहे. तसेच कान्हे ग्रामस्थांच्या मागणीनुसार भविष्यकाळामध्ये सर्वसामान्य नागरिकांना उपयोगी असे सभागृह, जिम, महिला योगा सेंटर व सार्वत्रिक कार्यक्रमांच्या उद्देशाने ३५० ते ४०० लोक बसतील अशा प्रशस्त हॉलचे महिलांसाठी प्रशिक्षण इतर सर्व प्रकारचे प्रशिक्षणासाठी, विवाह सोहळा व वाढदिवस आदी सार्वजनिक वापरासाठी अद्यावत सभागृह मौजे कान्हे – आंबेवाडी येथे उभारण्यात येणार आहे.
आंबेवाडी येथील सिद्धिविनायक सोसायटीमधील अंबादास पाचपोर यांनी ३ एकर जागा ग्रामपंचायतीस बक्षीसपत्र करून ७/१२ ग्रामपंचायतीच्या नावे करून दिला आहे. यासाठी सरपंच विजय सातकर, ग्रामपंचायत सदस्य किशोर सातकर, भाऊ शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले आहे. सरपंच विजय सातकर व ग्रामपंचायत कान्हे यांच्या वतीने अंबादास पाचपोर यांचा सन्मान करण्यात आला.