नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे आज सकाळी निधन झाले. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देशाच्या राजकारणातील प्रमुख चेहऱ्यांपैकी एक असलेल्या मुलायमसिंह यादव यांच्या प्रकृतीसाठी लोक प्रार्थना करत होते. त्यांच्या आयुष्यात त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि देशाचे संरक्षण मंत्रीपद भूषवले. दरम्यान,तुम्हाला आश्चर्य वाटेल की मुलायम सिंह यादव राजकारणात येण्यापूर्वी शिक्षक होते.जाणून घ्या त्यांच्या राजकारणा अगोदरच्या करिअरविषयी…
मुलायम सिंह यादव यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1939 रोजी उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातील सैफई येथे झाला. मुलायम यांचे शिक्षण राज्यातील इटावा, फतेहाबाद आणि आग्रा येथून झाले हते. मुलायम सिंह यादव यांनी करहल (मैनपुरी) येथील जैन इंटर कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीटी (बॅचलर ऑफ टीचिंग) आणि बीए पदवी प्राप्त केली होती. त्यांनी आग्रा विद्यापीठातून राज्यशास्त्रात एमएदेखील केले होते.
राजकारणात येण्यापूर्वी मुलायमसिंह यादव हे शिक्षक होते. करहाल भागातील जैन इंटर कॉलेजमधून त्यांनी आपल्या शैक्षणिक कारकिर्दीला सुरुवात केली. खरं तर, 1955 मध्ये मुलायम सिंह यादव यांनी जैन इंटर कॉलेजमध्ये नवव्या वर्गात प्रवेश घेतला. येथून १९५९ मध्ये इंटर्निंग केल्यानंतर १९६३ मध्ये त्यांनी सहाय्यक शिक्षक म्हणून अध्यापनाला सुरुवात केली. त्यावेळी त्यांना 120 रुपये मासिक पगार मिळत असे म्हटले जायचे. त्यांनी माध्यमिक शाळेत सामाजिक शास्त्र हिंदी आणि इंटर या विषयात शिकवले.
मुलायमसिंह यादव यांची शिकवण्याची शैली खूपच वेगळी आणि मनोरंजक होती, सांगण्यात येत होते. एखाद्या शिक्षकाप्रमाणे त्यांनी मुलांना घोकम पट्टीचे धडे दिले नाहीत. विषयात रस आणण्यात ते पटाईत होते. मुलांना मारहाण करण्याला त्यांचा कडाडून विरोध होता. त्यांचा असा विश्वास होता की मुलांना मारल्याने त्यांच्या बुद्धीचा विकास खुंटतो. त्यामुळे ते सर्व विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक बनले होते.