प्रियांका गांधींची मुलायम सिंह यादव यांना ट्विटद्वारे श्रद्धांजली

नवीदिल्ली – उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. मुलायमसिंग गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात होते, प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. रविवारपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मुलायमसिंह यादव यांच्या निधनानंतर सपा कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
श्री मुलायम सिंह यादव यांच्या निधनाची दु:खद बातमी समजली. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, भारत सरकारचे संरक्षण मंत्री आणि सामाजिक न्यायाचे खंबीर पुरस्कर्ते म्हणून भारतीय राजकारणातील त्यांचे अतुलनीय योगदान नेहमीच स्मरणात राहील. अशा आशयाचे ट्विट प्रियांका गांधी यांनी केले आहे.
श्री मुलायम सिंह यादव जी के निधन का दुखद समाचार मिला। भारतीय राजनीति में उप्र के पूर्व मुख्यमंत्री, भारत सरकार के रक्षामंत्री व सामाजिक न्याय के सशक्त पैरोकार के रूप में उनका अतुलनीय योगदान हमेशा याद रखा जाएगा।@yadavakhilesh व अन्य सभी प्रियजनों के प्रति मेरी गहरी शोक संवेदनाएं
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) October 10, 2022
कुस्तीपटू आणि शिक्षक असलेल्या मुलायम यांचा राजकीय प्रवास फार प्रदीर्घ होता. ते तीन वेळा यूपीचे मुख्यमंत्री होते तसेच केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून देखील त्यांनी कामकाज पाहिले. ते त्यांच्या धाडसी राजकीय निर्णयांसाठीही ओळखले जातात.





