देहूरोड – संसदेत फॉरेन फंडिंगच्या मुद्द्यावर भाषण करताना ख्रिस्ती धर्मगुरू ग्राहम स्टेन्स यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल देहूरोड येथे ख्रिस्ती समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.‘
रेव्ह. डॉ. सॉलोमनराज भंडारे यांच्या नेतृत्वात ख्रिस्ती समाजाच्या वतीने देहूरोड येथील मेन बाजार पेठेतील ऐतिहासिक नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात निषेध व्यक्त करीत आंदोलन करण्यात आले. खासदार सिंह यांनी ख्रिस्ती धर्मगुरू ग्राहम स्टेन्स यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करत ख्रिस्ती समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या कृत्याचा निषेध व्यक्त करीत त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीचे पत्र देशाचे राष्ट्रपती व पंतप्रधान यांना पाठविण्यात आले असल्याची माहिती भंडारे यांनी दिली. पास्टर सुनील वाघमारे, एस. बी. मनोज, महेश बेंजामीन, राजेंद्र कदम, सायमन कानडी, डेव्हिड काळे, मनसेचे शहराध्यक्ष जॉर्ज दास आदी या वेळी आंदोलनात सहभागी झाले होते.