राजगुरूनगर (पुणे) – खेड तालुक्यात मागील 24 तासांत नव्याने 105 जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील बाधितांची संख्या 6811 वर पोहोचली आहे.
मागील 24 तासांत राजगुरूनगर (15), चाकण (28), आळंदी (13) या तीन नगरपरिषदांमिळून 56 तर ग्रामीण भागातील मेदनकरवाडी (5), कडाचीवाडी, आंबेठाण, महाळुंगे (प्रत्येकी 4), खराबवाडी, कुरुळी, केळगाव, कोयाळी (प्रत्येकी 3), संतोषनगर, चिंबळी, धानोरे (प्रत्येकी2), दोंदे, खालुंब्रे, नाणेकरवाडी, निघोजे, शेलू, वराळे, वाकी खुर्द, येलवडी, बुट्टेवाडी, राक्षेवाडी, सातकरस्थळ, गोलेगाव, शेलपिंपळगाव, चास (प्रत्येकी 1) या 25 गावांत 49 असे एकूण 105 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.