‘समाजासाठी सतत झगडणारे नेतृत्व खासदार बारणे’

करोना योद्‌ध्यांचा सन्मान

पिंपरी – खासदार श्रीरंग बारणे नेहमी समाजाचा विचार करतात. मतदारसंघातील प्रश्‍नांसाठी संसदेत नेहमी भांडतात. प्रश्‍न मांडून मार्गी लावण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. खासदार बारणे यांचे व्यक्तिमत्त्व सतत फुलत राहणारे असल्याचे गौरवोद्‌गार खासदार श्रीनिवास पाटील यांनी काढले.

खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाउंडेशनच्या वतीने खासदार बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त आदर्श व्यक्‍तिमत्त्व, संस्थांचा आणि करोना योद्‌ध्यांचा खासदार पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात मंगळवारी (दि. 16) हा कार्यक्रम झाला.

या वेळी खासदार श्रीरंग बारणे, सरिता बारणे, सिम्बॉयोसिस अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, कामगार नेते इरफान सय्यद, नगरसेवक नीलेश बारणे, सचिन भोसले, नगरसेविका अश्‍विनी चिंचवडे, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, शशिकिरण गवळी, मधुकर बाबर, युवा सेनेचे विश्‍वजित बारणे, प्रताप बारणे, धनाजी बारणे, रवी नामदे उपस्थित होते.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, गेली वीस वर्षे नगरसेवक आणि दोनवेळा खासदार म्हणून जनतेने निवडून दिले. या कालावधीत शहराची जडणघडण मी स्वत: पाहिली आहे, असे सांगत करोनाकाळात ज्यांनी मानव जातीची सेवा केली त्यांचा सत्कार करणे मी माझे कर्तव्य समजतो. पद्मश्री गिरीश प्रभुणे, सिम्बायोसिसचे डॉ. विजय नटराजन, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा सत्कार करण्यात आला. तसेच डॉक्‍टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी गौरव करण्यात आला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.