मुंबई – बॉलीवूडमधील आजच्या घडीला सर्वात बोल्डनेस अभिनेत्रींची नावे घ्यायची झाली तर त्यात ‘मौनी रॉय’ या नावाचा देखील समावेश होतो. मौनी रॉय कायमच आपल्या अदा आणि हॉटनेस ने चाहत्यांना घायाळ करत असते. एखादी अप्सरा देखील तिच्या पुढे फिकी पडेल. असे कौतुक चाहत्यांकडून केले जाते.
तसेच ती फक्त किलर लुक्सनेच नाही तर आपल्या सडपातळ बांधा व सौंदर्याच्या जादूनेही चाहत्यांची भंबेरी उडवते. अश्यातच तिचा एक जबरदस्त लूक नुकताच ‘स्टाईल आयकॉन अवॉर्ड’ मध्ये दिसून आला आहे. जो पाहून चाहत्यांच्या काळजाचं अक्षरशः पाणी पाणी झालं आहे. मौनी रॉयचा हाच लेटेस्ट लूक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
तिच्या चमचमणा-या बॅकलेस ड्रेसने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. या शिमरी आऊटफिटमध्ये ती खूपच जास्त स्टनिंग दिसत होती. मौनीचे या ड्रेसमधील फोटोशूट देखील समोर आले आहे. ज्यात ती जबरदस्त पोझ देताना दिसत आहे. तिचा हा लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून तिच्या अदांनी आणि सौंदर्याने लाखो चाहत्यांनां नक्कीच वेड लावले असेल यात कोणतीच शंका नाही.