नवी मुंबई – नवी मुंबईतील नेरूळ भागात पैशासाठी पोटच्या मुलांना विकण्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या आरोपीने पहिली मुलगी 90 हजाराला तर दुसरी मुलगी दोन लाख रुपयांना विकल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र या महिलेचा तिसरा मुलगा विकल्याच्या प्रकरणाचा अद्याप उलगडा झाला नासून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
या घटनेची माहिती मिळताच महिला बाल विकास विभाग आणि नवी मुंबई पोलिसांनी आरोपी आईला अटक केली. तर मुख्य आरोपी फरार झाला होता. त्यालाही ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. आईची कसून चौकशी केली असता, पहिली मुलगी 90 हजार, दुसरी 2 लाख रुपयांना विकल्याचे तिने सांगितले. तर तिसरा मुलगा मात्र कुठे विकला याबाबत अजून काही समजले नाही. तर दोन मुलांचा शोध लागला असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर तिसऱ्या मुलाचा शोध सुरू असून त्याला शोधण्यासाठी पथक रवाना झाले असल्याचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले.
या जोडप्याने 2029 मध्ये आपली 3 महिन्यांची मुलगी नवी मुंबईतील एनआरआय परिसरात विकल्याची माहिती तपासात दिली. त्यानुसार ही मुलगी खरेदी करणाऱ्या महिलेचे घर गाठले व ही मुलगी ताब्यात घेण्यात आली. हा व्यवहार 90 हजार रुपयांना झाल्याचे सापडलेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट झाले. बाळाची खरेदी व विक्री करणाऱ्या दोघींविरोधात नेरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या मुलीनंतरचा मुलगा आरोपीने कोठे विकला आहे यांच्या शोध सुरू आहे.