मुंबई : राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच चालली आहे. देशात आतापर्यंत ‘सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहे. नवी मुंबई आणि यवतमाळमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडल्याने आता कोरोना बाधितांची संख्या 26 झाली आहे.
कोणत्या शहरात किती कोरोना बाधित?
पुणे – 10
मुंबई – 5
नागपूर – 4
यवतमाळ – 2
अहमदनगर – 1
कल्याण 1
पनवेल – 1
नवी मुंबई – 1
ठाणे – 1
कोरोना विषाणूचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी 31 मार्चपर्यंत राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान बुलडाणा जिल्ह्यात एका कोरोना संशयित रुग्णाचा दुपारी मृत्यू झाला आहे.