बाधितांची संख्या 974 वर 238 रुग्णांवर उपचार सुरू
सातारा, दि. 28 (प्रतिनिधी) -जिल्ह्यातील विविध रुग्णालये व करोना केअर सेंटर्समध्ये उपचार घेत असलेल्या 36 नागरिकांच्या कोव्हिड चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. दरम्यान, जावळी तालुक्यातील रामवाडीतील तब्बल 12 जणांना गेल्या दोन दिवसांत करोनाची बाधा झाल्याने तालुक्यात घबराट पसरली आहे. तालुका प्रशासन व आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहेत.
जिल्ह्यात करोनाबाधितांची एकूण संख्या आता 974 झाली असून एक हजाराच्या दिशेने गतीने वाटचाल सुरू आहे. आतापर्यंत 42 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. कराड तालुक्यातील खुबी येथील 19 वर्षांचा युवक, रेठरे खुर्द येथील 21 वर्षांची महिला, तारुख येथील 60 वर्षांची महिला, पाटण तालुक्यातील सितापवाडीतील 60 व 28 वर्षे वयाच्या महिला, 31 वर्षांचा युवक, माण तालुक्यातील खांडेवाडी (वारुगड) येथील 33 वर्षांचा युवक, खटाव तालुक्यातील येळीव येथील 76 वर्षांची महिला, 24 व 26 वर्षे वयाचे युवक, कोरेगाव तालुक्यातील बनवडीतील 39 वर्षांचा युवक, किरोली येथील 26 व 28 वर्षांचे युवक, नागझरीतील 28 वर्षांचा युवक, जावळी तालुक्यातील रामवाडीतील 48 वर्षांची महिला, 33 व 30 वर्षांचे युवक, 26 वर्षांची महिला, 11 वर्षांचा मुलगा, 22 वर्षांची महिला, 40 वर्षांची महिला, 16 वर्षांचा युवक, 18 वर्षांची युवती, 38 वर्षांचा युवक, धोंडेवाडी येथील 65 वर्षांचा पुरुष, सातारा तालुक्यातील गोडोली येथील 55 वर्षांचा पुरुष, जिहे येथील 50 वर्षांची महिला, चंदननगर (कोडोली) येथील 39 वर्षांची महिला, धावली येथील 26 वर्षांचा युवक, बोरगाव येथील 31 वर्षांचा युवक, चोरगेवाडीतील 50 वर्षांचा पुरुष, सासपडे येथील 23 वर्षांचा युवक, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 60 वर्षांची महिला, शिरवळ येथील शहाजी चौकातील 20 व 42 वर्षांचे पुरुष, वाईतील सह्याद्रीनगर येथील 30 वर्षांचा पुरुष यांचा पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये समावेश आहे. एक रुग्ण पुणे येथे स्थायिक असल्याने त्याची गणना जिल्ह्यातील रुग्णांमध्ये केलेली नाही.
191 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
पुणे येथील एनसीसीएस व कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधून 191 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले. दरम्यान, जिल्ह्यात काल (दि. 27) रात्री आणखी 19 नागरिकांचे रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली. या करोनाबाधित रुग्णांमध्ये 13 पुरुष व सहा महिलांचा समावेश आहे. मुंबईतून प्रवास करून आलेले 12 तर सात जण बाधित रुग्णाच्या निकट सहवासातील आहेत. कराड तालुक्यातील जखीणवाडीतील 47 वर्षांची महिला, 23 वर्षांची युवती, 52 वर्षांचा पुरुष व 19 वर्षांचा युवक, लटकेवाडी (सवादे) येथील 50 वर्षांचा पुरुष, 19 वर्षांचा युवक, 42 वर्षांची महिला व 21 वर्षांची युवती, मलकापूर येथील 29 वर्षांचा पुरुष, चचेगाव येथील 34 वर्षांचा पुरुष, खंडोबानगर (मलकापूर) येथील आठ वर्षांचे बालक, 30 वर्षांचा युवक, 50 वर्षांचा पुरुष, 45 व 30 वर्षे वयाच्या महिला, पाटण तालुक्यातील नवसरे येथील 42 वर्षांचा पुरुष, गमेवाडी येथील 50 वर्षांचा पुरुष, खटाव. ता. खटाव येथील 62 वर्षांचा वृद्ध, म्हसवड, ता. माण येथील 58 वर्षांचा पुरुष, यांचे करोना चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे डॉ. गडीकर यांनी सांगितले.