चंद्रपुर – चंद्रपुर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात आज एक जण ठार झाला. तोहागाव वन विभागात हा प्रकार घडला. चंद्रपुर पासून हा भाग 60 किमी अंतरावर आहे. मृत इसमाचे नाव दिनकर ठेंगरे असे आहे.
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्याचा हा या वर्षातला 17 वा प्रकार आहे. आज हल्ला करणाऱ्या वाघाला पकडण्यासाठी वन विभागातर्फे त्या परिसरात 16 कॅमेरे लावले जातील अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
हा वाघ परिसरातील अन्य नागरीकांसाठीही धोकादायक ठरू शकतो त्यामुळे त्याला शक्य तितक्या लवकरच पकडले जाईल असे त्यांनी सांगितले.