जोरदार पावसाने शेतकरी हवालदिल

 

सविंदणे- सततच्या पावसाने शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला असून अतिशय मेहनतीने व कष्टाने उभी केलेली पावसामुळे उभी पिके आडवी झाल्यामुळे नुकसान होऊन शेतकऱयांचे कंबरडे मोडले आहे. जीवन मरणाचा प्रश्न शेतकऱयांसमोर आ वासून उभा आहे.खरीप हंगामात बाजरी,मूग,सोयाबीन, मका इत्यादी पिकांची पेरणी केली.पिके जोमात आली पण ऎन काढणीच्या वेळी पावसाने धुमाकूळ करून काढलेली बाजरीची कणसे भिजली गेली. मूग काळे पडले.सोयाबीन पाण्यात सडत आहे. पावसामुळे शेतकऱयांची दयनीय अवस्था झाली आहे.फळ पिकामध्ये डाळिंब बागा व सीताफळ बागेचे नुकसान झाले असून सीताफळाला मिलीबग व काळे डाग पावसामुळे पडले असून शेतकरी हा दुहेरी संकटात सापडला आहे. सुरुवातीच्या काळात कांद्याला भाव ६० ते ७० रुपये प्रति दहा किलो होता.आता जरी बाजार भाव वधारला असेल तरी वखारी मध्ये साठवून ठेवलेला केवळ १५ टक्के माल हवामानमूळे,तो पण खराब होण्याच्या मार्गावर आहे.एकूण सर्व विचार करता बाजार वाढले असतील तरी माल शिल्लक नाही.रब्बी हंगाम कांदा लागवडीसाठी तयार केलेले कांदे रोप अतिवृष्टीमुळे खराब झालेली आहे.थोडेफार शिल्लक असलेले कांद्याचे रोप लागवड करावी तरी जमिनीत वाफसा नाही. सर्व बाजूने शेतकरी अडचणीत आला आहे. कांदा बी कोणाकडून घ्यायचे ठरले तर रुपये ३५०० ते ४००० रुपये किलो या भावाने विकत घेऊन सुद्धा उगवण क्षमता होती की नाही यावर दुकानदार व कंपनीवाले कुठल्या प्रकारची गॅरंटी देत नाही.

सध्या बाजारात बोगस कांदा बी यांचा सुळसुळाट झाला असून याबाबत शेतकऱयांनी काळजी घेणे आवश्यक आहे. करोना संकट काळामध्ये काही शेतकरी फुल शेतीकडे वळाले.ते सुद्धा पीक पावसामुळे खराब होण्याच्या मार्गावर आहे.दसरा दिवाळीच्या मुहूर्तावर फुलांचे हक्काचे दोन रूपये मिळणार अशी शेतकऱयांची अपेक्षा असली तरी तो पर्यंत निसर्ग साथ देईल की नाही हे सांगता येत नाही. सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सर्व पक्षांनी सर्व शेतकऱयांची सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करू असा शब्द शेतकर्याला दिला असता तरी अद्यापही नियमित कर्जफेड करणाऱया शेतकऱयाला कुठल्याही प्रकारे फायदा झालेला नाही.

३१ मार्च नियमित कर्जफेड करणाऱया शेतकर्यांनी सावकाराकडून कर्ज घेतले तसेच पतपेढीत बायकोचे दागिने गहाण ठेवून आपले खाते नवे-जुने करतो.आपली पत जाऊ नये म्हणून आजही नियमित कर्ज भरणारे शेतकरी असले तरी सरकारकडून प्रोत्साहनपर शेतकऱयाला एकही रुपया मिळालेला नाही.ज्यांनी चार ते पाच वर्षांपूर्वी कर्ज घेतले व थकले किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे भरता आले नाही.त्या शेतकऱयाला दोन लाखापर्यंत कर्ज माफ केली व त्यांना नव्याने कर्ज वाटप केले हे सरकारला चांगलं जमतंय तर नियमित वाल्यांनी काय पाप केले आहे.असा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे? !! सोसायटीचे कर्ज थकवू नका असे म्हणून चेअरमन सचिवांनी सोसायटीत केला राडा.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने लावला चुना.!! ” आता तुम्ही कितीबी रडा पण पन्नास हजाराची प्रोत्साहनपर योजनेची कर्जमाफीची आशा सोडा ” असं बळीराजाला म्हणावे लागेल.वास्तविक पाहता थकितवाल्यांना दोन लाखापर्यंत कर्ज माफ केले.याचे आम्हाला दुःख नाही.परंतु ज्या शेतकऱयांनी नियमित कर्जफेड केली त्या शेतकऱयांना कमीत कमी पन्नास हजार रुपये व ज्या शेतकऱयांनी एक लाखाच्या वर कर्ज विकास सोसायटी कडून अथवा राष्ट्रीयीकृत बँकेकडून घेतली आहे त्या शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या पन्नास टक्के तरी रक्कम शेतकऱयांना विनाविलंब द्यावी. सर्व परिस्थितीचा विचार करता महसूल व कृषी विभागाने अतिवृष्टीमुळे ज्या खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे.

त्या सर्व पिकांचे लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱयांना दिवाळीच्या मुहूर्तावर भरीव मदत करावी पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत ज्या शेतकऱयांनी तालुका व जिल्हा पातळीवर सरकारने नेमून दिलेल्या कंपन्यांकडे शेतकऱयांची ऑनलाईन अर्ज करून विमा रक्कम जमा केलेली आहे.त्या सर्व शेतकऱयांना विमा योजनेचालाभ मिळावा अशी मागणी संविदणे (ता.शिरूर) येथील प्रगतशील शेतकरी व डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ नवी दिल्लीचे सदस्य बाळासाहेब पडवळ व शेतकऱयांनी केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.