मुंबई – अभिनेता किथ सिक्वेरा आणि अभिनेत्री रोशेल राव या जोडप्याने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. लवकर हे दोघे आई – बाबा होणार आहेत. नुकतेच या दोघांनी त्यांचे समुद्र किनाऱ्यावरील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ‘बिग बॉस 9’ या रिअॅलिटी शोमध्ये हे दोघे एकत्र झळकले होते. याशिवाय ते ‘नच बलिए’ मध्येही एकत्र दिसले होते.
रोशेलने 2 ऑगस्ट 2023 रोजी आई होणार असल्याची घोषणा करत इनस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. तसेच समुद्रकिनाऱ्यावरील त्यांचे फोटोशूट अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. या फोटोशूटमध्ये रोशेलने फिकट गुलाबी रंगाचा ड्रेस घातला आहे, तर किथनेही मॅचिंग शर्ट आणि पांढरी पँट घातली आहे. यावेळी दोघांनीही समुद्रकिनारी एकापेक्षा सुंदर पोझ दिल्या आहेत.
View this post on Instagram
या जोडप्याने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “दोन लहान हात, दोन लहान पाय, एक लहान मुलगा किंवा मुलगी ज्याला भेटण्यासाठी आम्ही वाट पाहू शकत नाही! होय, तुमचा अंदाज बरोबर आहे, आम्ही पालक होणार आहोत! या अविश्वसनीय भेटीसाठी प्रभू येशूंचे आणि तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी तुम्हा सर्वांचे आभार. या नवीन प्रवासात आम्हाला आशीर्वाद द्या आणि आमच्यासाठी प्रार्थना करत राहा.” या पोस्टनंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. किथ सिक्वेरा आणि रोशेल राव 2018 मध्ये तामिळनाडूच्या महाबलीपुरममध्ये लग्नबंधनात अडकले होते. त्यानंतर आता लग्नाच्या पाच वर्षानंतर हे जोडपे आई- बाबा होणार आहे.