भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्यात वाद सुरू आहे. मोहम्मद शमी आणि हसीनने २०१४ मध्ये लग्न केले होते. चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर 2018 मध्ये हे जोडपे वेगळे झाले. यादरम्यान हसीन जहाँने मोहम्मद शमीवर गंभीर आरोप केले. हसीन जहाँने शमीवर मारहाणीचा आरोप केला होता. हसीनने पुन्हा एकदा मोहम्मद शमीवर हल्ला चढवला आहे. यासाठी तिने रोहित शर्माच्या फोटोचा आधार घेतला आहे. मात्र या हल्ल्यानंतर हसीनला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यासाठी तिने भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू रोहित शर्मा आणि त्याच्या मुलीचा फोटो वापरला आहे. या पोस्टद्वारे हसीनने शमीवर निशाणा साधला आहे. पोस्टमध्ये तिने मुलींच्या आयुष्यात वडिलांची भूमिका सांगितली आहे. मुलगी आणि वडील यांच्यातील प्रेमळ नात्याची तुलना यावेळी तिने केली आहे.
कॅप्शनमध्ये काय म्हटले आहे
हसीनने आपल्या पोस्टमध्ये शमीचा थेट उल्लेख टाळला असला तरी वडील आणि मुलीचे नाते सांगत तिने शमिला पुन्हा एकदा टार्गेट केल्याचे दिसून येते. हसीन पोस्टमध्ये म्हणते की, “अनेक वडिलांना मुलीच्या लहान हातांमध्ये शांतता मिळते. पण काही बाप वेश्यांच्या कुशीत आहेत. पुढे ती म्हणते, ‘अल्लाहाने कोणत्याही मुलीला चारित्र्यहीन बाप देऊ नये. माझ्या चिमुरडीला धीर देण्यासाठी मी अल्लाहला प्रार्थना करते”
View this post on Instagram
यूजर्सने हसीनला ट्रोल केले
हसीनच्या इन्स्टाग्राम पोस्टवर यूजर्स भरपूर कमेंट करत आहेत. काहींनी पतीबद्दल वैयक्तिक विधाने करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा गैरवापर केल्याबद्दल तिच्यावर टीका केली आहे. एका इंस्टाग्राम युजरने म्हटले, “ड्रामा क्वीन. रोहित शर्माचा फोटो वापरल्याबद्दल आणखी एका व्यक्तीने नाराजी व्यक्त केली आहे. आणखी एक संतप्त वापरकर्ता म्हणाला, “तुझ्यासारखी आई कोणालाच नसावी,” तर दुसऱ्याने काही बायका आपल्या फायद्यासाठी आपल्या मुलांना वडिलांपासून दूर नेल्याचा आरोप केला.