“2024 लोकसभेसाठी मोदींनी सुरक्षित मतदारसंघ शोधावा”, ‘या’ पक्षाने दंड थोपटले

नंदीग्राम  – पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ममता बॅनर्जी विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी असा राजकीय संघर्ष बघायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी भाजपाने सर्वस्व पणाला लावले आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत असताना पंतप्रधान मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली होती. पंतप्रधानांच्या टीकेला तृणमूलने प्रत्युत्तर दिले असून, 2024 लोकसभा निवडणुकीत मोदींविरोधात उमेदवार देण्याचे आव्हान दिले आहे.

आपला पारंपरिक मतदारसंघ सोडून तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी पक्षातून बाहेर पडून भाजपाकडून निवडणूक लढवणाऱ्या सुवेंदू अधिकारी यांना आव्हान दिले आहे. नंदीग्राममध्ये ममता आणि सुवेंदू यांच्या मोठी लढत होत असून, गुरूवारी (1 एप्रिल) मतदानही पार पडले आहे. नंदीग्राममध्ये मतदान सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममतांवर निशाणा साधला होता.

ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राममध्ये पराभव होणार असून, त्या दुसऱ्या मतदारसंघातून अर्ज भरणार असल्याची चर्चा सुरू आहे, असा टोला मोदींनी लगावला होता. नरेंद्र मोदी यांच्या टीकेला तृणमूल कॉंग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. तृणमूल कॉंग्रेसने ममता दुसऱ्या मतदारसंघातून लढणार असल्याचे वृत्त फेटाळून लावतानाच मोदींना आव्हान दिले आहे.

दीदी, नंदीग्राममधून जिंकत आहे. दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. नरेंद्र मोदीजी पश्‍चिम बंगालमध्ये अर्ज भरण्याच्या अखेरीस तुमचं खोटं लोकांच्या नजरेत येण्याच्या आधीच लोकांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न थांबवा. आपण 2024 साठी सुरक्षित मतदासंघ शोधा, कारण वाराणसीमध्ये तुम्हाला आव्हान दिले जाईल, असे म्हणत तृणमूलने मोदींवर पलटवार केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.