मुंबई – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या मुंबईत असून त्यांनी मुंबईतील मेट्रोच्या नव्या मार्गाचे उद्घाटन केले. तसेच पंतप्रधानांनी स्वदेशी मेट्रो कोच आणि नव्या मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटनही केले. दरम्यान, यावेळी मोदींनी विले पार्ल येथील ‘लोकमान्य सेवा संघ टिळक’ गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.यावेळी त्यांच्यासोबत राज्यपाल भगत कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित होते. त्यानंतर मोदींनी मेट्रोच्या तीन मार्गिकांचे भूमिपूजन केले.
Hon PM @narendramodi ji, Hon Governor @BSKoshyari and CM @Dev_Fadnavis took Ganesh Darshan and blessings at Lokmanya Seva Sangh in Vile Parle, Mumbai. pic.twitter.com/fnrxI4F5cQ
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 7, 2019