ऑनलाईन गेममुळे 40 हजार हारला; सहावीत शिकणाऱ्या मुलाची आत्महत्या, सुसाईट नोट मध्ये आईला दिला ‘हा’ सल्ला

छतरपुर – ऑनलाईन गेम खेळताना 40 हजार हारल्यामुळे 13 वर्षीय मुलाची राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्या प्रकार घडला आहे. हा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशच्या छतरपुर जिल्ह्यात घडला आहे. आत्महत्येपुर्वी या मुलाने सुसाईट नोट लिहली आहे.

कृष्णा पांडे असे या मुलाचे नाव असून तो सहावीचा विद्यार्थी होता. शुक्रवार रोजी कृष्णाची आई प्रिती पांडे यांना त्यांच्या बॅंक खात्यावरून 1500 रुपये कट झाल्याचा मेसेज आला. याबाबत पैसे का काढले याची विचारणा प्रिती यांनी कृष्णास केली. तेव्हा कृष्णाने हे पैसे ऑनलाईन गेममुळे कट झाल्याचे सांगितले यावरुन प्रिती यांनी नाराजी व्यक्त केली.

त्यानंतर कृष्णा आपल्या रुममध्ये गेला. काही वेळानंतर कृष्णाच्या मोठ्या बहिणीने दरवाजा वाजवला, मात्र आतून काहीच उत्तर मिळाले नाही. मुलीने याबाबत आपल्या वडिलांना माहिती दिली. आई-वडील लगेचच घरी पोहोचले आणि त्यांनी दरवाजा तोडला असता कृष्णाने गळफास घेतल्याचे त्यांना दिसले.

कृष्णाच्या जवळ एक सुसाईट नोट आढळली. ही सुसाईड नोट इंग्रजीमध्ये लिहिली गेली होती. यामध्ये फ्री फायर गेममध्ये आपण 40 हजार रुपये हरल्याचा त्याने लिहीले होते. तसचे या सुसाईट नोटमध्ये कृष्णाने आपल्या आई-वडिलांची माफी मागितली तसेच आईला न रडण्याचा सल्ला दिला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.