लोणी – अमरनाथ यात्रेत अडकलेल्या भाविकांना मंत्री विखे यांची मदत थेट जम्मु कश्मिरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी संपर्क साधून सहकार्य उपलब्ध करुन दिल्याने अडकलेल्या भाविकांचा परतीचा मार्ग सुखर झाला आहे.
अमरनाथ आणि वैष्णोदेवी यात्रेकरीता श्रीरामपूर, कोल्हार, लोणी या भागातील असंख्य नागरीक गेले होते. मात्र जम्मु आणि कश्मिर मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्ठी झाल्याने तसेच पाऊसामुळे श्रीनगर ते जम्मु या रस्तेही खचल्याने सर्व भाविकांना अडकून पडावे लागले. अडकलेल्या भाविकांना लष्कराच्या सहकार्याने त्या परिस्थितीत मुक्कामही करावा लागला. या भाविकांपैकी अनेकांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याशी संपर्क साधला
मंत्री विखे पाटील यांनी जम्मु कश्मिरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी संपर्क साधून भाविकांना सर्वतोपरी मदत करण्याची विनंती केली. राज्यपालांना महाराष्ट्रातील सर्वच भाविकांना मदत करण्याची ग्वाही देत नगर जिल्ह्यातील भाविकांनाही मदत करण्याचे आश्वासित केले. काही वेळातच या भाविकांपर्यंत यंत्रणा पोहोचली असल्याचेही त्यांनी मंत्री विखेपाटील यांना सांगितले. केलेल्या मदतीबद्दल मंत्री विखे यांनी राज्यपालांचे आभारही मानले.
या भागातील परिस्थिती आता निवळत असून, लष्कराने विविध ठिकाणांहून मार्गांची उपलब्धताही करुन दिल्याने हे सर्व भाविक सुखरुपपणे परतीच्या प्रवासासाठी निघाले असल्याबाबतही सांगण्यात आले. मंत्री विखे पाटील यासर्व प्रवासी भाविकांच्या संपर्कात आहे.