रेडा -घोरपडवाडी (ता. इंदापूर) येथील एका महिलेस करोनाची लागण झाली असल्याने कंटेन्मेंट झोन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे काम अत्यंत महत्वाचे काम असेल तरच, नागरिकांनी बाहेर पडावे अन्यथा खबरदारी म्हणून घरात राहणे पसंत करावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम व पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
घोरपडवाडी येथील करोना बाधित महिला रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गावात जाऊन परिस्थितीची पाहणी करून आढावा घेतला.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष अतुल झगडे, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे – पाटील, तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.