मुंबई – फॅंड्री मधील शालू सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. या चित्रपटात मराठी अभिनेत्री राजेश्वरी खरातने दमदार भूमिका साकारली होती. सध्या सोशल मीडियावर शालूचे जब्बर फोटो पाहून आता शालूच्या फोटोंवरील मीम्स प्रचंड व्हायरल होत आहेत.
अभिनेत्री राजेश्वरी खरातने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तसेच फेसबुकवर फोटो शेअर केल्यानंतर त्यावर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतो. अशातच सरकारने सर्वात आधी फॅंड्रीतल्या शालूच्या फोटोवरच्या कमेंट्सवर लॉकडाऊन लावावा, तिथेच सर्वात जास्त गर्दी होते’ असे मिम सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.
त्यामध्ये राजेश्वरीच्या लूक्सचे कौतुक करणाऱ्या चारोळ्याही असतात. विशेष म्हणजे त्यापैकी काही कमेंट्सना राजेश्वरी स्वतः उत्तरही देते. त्यामुळे तिचं लक्ष वेधून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता असते. दरम्यान, व्हायरल होणाऱ्या शालूच्या मिम्सवर आता शालू ऊर्फ राजेश्वरी खरात प्रतिक्रिया देणार का? याकडेही चाहत्यांचे लक्ष आहे.