लंडन – शरीराने स्थूल असणे हे सौंदर्याचे चांगले लक्षण मानले जात नाही सामाजिक व्यवहारात स्थूल व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो त्याशिवाय अशा व्यक्तीकडे बघणाऱ्यांच्या नजराही विचित्र असू शकतात जाडेपणा हंस अनेकांसाठी समस्या आणि टीकेचा विषय असला तरी लंडनमधील एका तरुणीने मात्र आपल्या स्थूलत्वाच्या जोरावर लाखोंची कमाई सुरू केली आहे
डॅनियल बीच असे या पंचवीस वर्षीय महिलेचे नाव असून तिचे वजन तब्बल 225 किलो आहे एवढे जाड शरीर घेऊन वावरताना तिला दैनंदिन आयुष्यात अनेक समस्या येत असल्या तरी त्याचेच भांडवल करून डॅनियलने आपल्या कमाईचा मार्ग म निवडले आहे .
जाड शरीरामुळे डॅनियल अनेक वेळा बाथटबमध्ये अडकते किंवा दरवाजातून बाहेर जात असताना सुद्धा समस्या येते पण ह्याच प्रकारच्या घटनांचा व्हिडिओ करून ती सोशल मीडियावर पोस्ट करते.
आणि प्रत्येक व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याने ती लाखो रुपयांची कमाई करू शकते सन या नियतकालिकाने दिलेल्या माहितीप्रमाणे डॅनियल या उपक्रमाच्या माध्यमातून दर महा दीड लाख ते दोन लाख रुपये कमाई करते याबाबत बोलताना डॅनियल सांगते की स्थूल व्यक्ती दैनंदित आयुष्यात कशा जगतात याबाबत लोकांना मोठ्या प्रमाणात उत्सुकता असते.
ही गोष्ट लक्षात आल्यानेच मी माझ्या दैनंदिन आयुष्यातील अनेक गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर प्रसारित करते लोकांना त्या गोष्टी पाहायला आवडतात आणि मला आर्थिक फायदा मिळतो आपल्या स्थूल शरीराचे चुकीचे प्रदर्शन होऊ नये म्हणून यापूर्वी डॅनियल थोडे ढगळ कपडे घालत असे पण आता तिला आपल्या शरीराबाबत न्यूनगंड कमी झाल्याने आधुनिक फॅशनचे कपडे घालूनही त्याबाबतचे व्हिडिओ ती आता पोस्ट करत आहे.