बॉलीवूडमधील यंगस्टार आणि आघाडीची अभिनेत्री अनन्या पांडे ही आपल्या अभिनयाबरोबरच फॅशनबल लुक आणि स्टाईलसाठीही ओळखली जाते. अनन्याच्या प्रत्येक स्टाईलवर चाहते फिदा होत असतात. तसेच तिच्या सदाबहार ट्रेंडमुळ ती सतत प्रसिद्धिच्या झोतात असते. असेच काहीसे फोटो अनन्याने नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अनन्या पांडे या लूकमध्ये वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. अनेक सेलिब्रिटीही तिच्या या स्टाइलवर कमेंट करत तिचे कौतुक करत आहेत. अनन्या पांडेने तिचे क्रॉप टॉप आणि शॉर्ट जॅकेटमधील फोटोशूट शेअर केले आहे. कुरळे केसांमधील अनन्या पांडेचा हा लूक इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ती या ड्रेसमध्ये फारच आकर्षक दिसत आहे. हा फोटो चाहत्यांशी शेअर केले आहे. हे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले असून त्यावर असंख्य चाहते कमेंट करत आहे.
अनन्या पांडे सतत आपल्या लुकने चाहत्यांना घायल करत असते. तसेच सर्वोत्तम स्टाईलही ती कॅरी करत असते. या फोटोंवर अनेकांनी लाईकस् करत कमेंट देत अनन्याचे तोंड भरून कौतुक केले आहे. अनन्या ही पॅन-इंडियाची सर्वात कमी वयाची स्टार म्हणून ओळखली जाते.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास अनन्या लवकरच विजय देवरकोंडासोबत “लिगर’मध्ये काम करत आहे. याशिवाय शकुन बत्राच्या आगामी चित्रपट ‘गहराइयांचे’ प्रमोशन करताना सिद्धांत चतुर्वेदी आणि दीपिका पादुकोणसह अनन्या पांडे दिसत आहे.