पुणे : पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव शहरात वाढू नये म्हणून पुणे पोलिसांतर्फे खबरदारी घेण्यात येत आहे. शहरातील दहा पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या परिसरात २३ एप्रिल पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. या परिसरात सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत दूध विक्री करता येणार आहे. तसे आदेश पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी काढले आहेत.
या आदेशांनंतर या प्रतिबंधित परिसरात बंदी
परिमंडळ एक
समर्थ, खडक आणि फरासखाना पोलिस ठाण्याच्या अखत्यारित येत असलेला संपूर्ण परिसर.
परिमंडळ दोन
स्वारगेट पोलिस ठाणे – गुलटेकडी, महर्षीनगर, डायसप्लाॅट
बंडगार्डन पोलिस ठाणे- ताडीवाला रस्ता
परिमंडळ तीन
दत्तवाडी पोलिस ठाणे- जनता वसाहत, पर्वती दर्शन परिसर, शिवदर्शन
परिमंडळ चार
येरवडा पोलिस ठाणे-लक्ष्मीनगर, गाडीतळ
खडकी पोलिस ठाणे- खडकी बाजार, कसाई मोहल्ला, पाटील इस्टेट झोपडपट्टी
परिमंडळ पाच
कोंढवा पोलिस ठाण्याचा संपूर्ण भाग
वानवडी पोलिस ठाणे- विकासनगर, सय्यदनगर, रामटेकडी,चिंतामणी नगर, वॉर्ड क्रमांक २४, हांडेवाडी, वॉर्ड क्रमांक २६ आणि २८. या प्रतिबंधित परिसरात दूध आणि औषध विकेत्यांशिवाय इतरांना परिसरात अन्य वस्तू विकण्यास मनाई करण्यात आली आहे.