अभिनेता सोनू सूद करोना काळात अनेकांसाठी देवदूतच ठरला. अनेक स्थलांतरित मजुरांना गावी पोहोचविण्यास मदत केली असून पैशाच्या स्वरुपात देखील मदत केली. लॉकडाऊन दरम्यान अनेक गोरगरिबांना मदत केली.
त्यामुळे कृतज्ञता म्हणून लोकांनी सोनू सूदच्या फोटोला दुधाने अभिषेक घातला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील श्री कालहस्ती येथील हे लोक आहेत.
View this post on Instagram
सोनू सूदने या व्हिडिओमुळे लोकांचे आभार मानले आहे. महाराष्ट्र सरकारपासून अन्य राज्यांतील सरकारसुद्धा त्याचे कौतुक करत आहे. सोनूने देशातील सर्वात मोठी रक्तपेढी तयार करण्याची योजना आखली आहे.
यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली आहे. सोनूच्या या कार्यामुळे लोकांनी त्याला देवाच्या जागी ठेवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.