मुंबई: हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. दरम्यान या दोघांमध्ये १५ मिनिट चर्चा झाली. एकबोटेंनी राज ठाकरे यांनी घेतलेल्या हिंदुत्वाच्या भूमिकेचं स्वागत केलं. या भेटीमुळे चर्चेला उधाण आलं आहे.
राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर मिलिंद एकबोटे यांनी माध्यमांशी संवाद साधला. एकबोटे म्हणाले, धर्मवीर संभाजी महाराजांचं वढू बुद्रूक येथील समाधीस्थळी 24 मार्चला संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राज ठाकरेंनी या कार्यक्रमाला येऊन समाधीला अभिवादन करण्यासाठी यावे आणि शंभू भक्तांना मार्गदर्शन करावं, अशी विनंती राज ठाकरेंना केली.