‘एमएचटी-सीईटी’चे हॉलतिकीट मिळणार सोमवारपासून

'पीसीबी' ग्रुपच्या विद्यार्थ्यांना डाऊनलोड करावे लागणार प्रवेशपत्र

‘पीसीएम’च्या विद्यार्थ्यांसाठी अद्याप सूचना नाही

पुणे – अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी अनिवार्य असलेली ‘एमएचटी-सीईटी’ ही येत्या दि.1 ऑक्टोबरपासून होत आहे. सीईटीसाठी अर्ज केलेल्या ‘पीसीबी’ ग्रुपच्या विद्यार्थ्यांना हॉलतिकीट आजपासून डाऊनलोड करता येणार आहे.

 

राज्य सीईटी सेलमार्फत ही सीईटी होत आहे. हॉलतिकीट असलेल्या विद्यार्थ्यालाच सीईटीसाठी प्रवेश दिला जाणार आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र विषय असलेल्या विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट उपलब्ध करून दिले आहेत. तर, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या म्हणजेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) ग्रुपचे हॉलतिकीट अद्याप काही स्पष्टीकरण राज्य सीईटी सेलने दिले नाही.

 

दरम्यान, पीसीबी ग्रुपच्या विद्यार्थ्यांची एमएचटी-सीईटी 1 ते 9 ऑक्टोबर 2020 या कालावधीत होत आहे. प्रवेश अर्जाचा क्रमांक आणि पासवर्डच्या साहाय्याने हे हॉलतिकीट डाऊनलोड करावयाचे आहे. हॉलतिकीटवर परीक्षा केंद्राचे नाव, परीक्षेची वेळ, तारीख, पत्ता आणि विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन राज्य सीईटी सेलने केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.