मुंबई – राज्य सरकारकडून दसऱ्याला म्हाडाच्या घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. ही लॉटरी 9 हजार घरांसाठी निघणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून यासंदर्भात लवकरचं जाहिराज देखील प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
दसऱ्याच्या मुहूर्तावर लॉटरी सोडत करण्यात येणार असून यामध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत येणारी 6500 घरे, कोकण मंडळ आवास परियोजनेअंतर्गत येणारी 2000 घरे आणि 20 टक्के योजनेअंतर्गत येणाऱ्या 500 घरांचा समावेश आहे.
900 हजारी घरांची या लॉटरी मध्ये देण्यात येणारी ही घरे ठाणे, मीरा रोड, वर्तकनगर, विरार बोळिंज नाका, कल्याण, वडवली आणि ठाण्याच्या गोथेघरमध्ये नागरिकांना उपलब्ध होणार आहेत.