मुंबई – बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ‘ऋषी कपूर’ यांचे आज (दि. 30) मुंबईत निधन झाले. कर्करोगावरील उपचारादरम्यान ऋषी कपूर यांची प्राणज्योत मालवली. तब्येत बिघडल्यामुळे मुंबईतील ‘सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन’ हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला पुष्टी दिली आहे.
दरम्यान, आतापर्यंत अनेक चित्रपटात ऋषी कपूर यांनी काम केले आहे. याच चित्रपटातील काही सुपरहिट गाणी तुमच्या कानावर पडली की तुम्हाला सुद्धा नक्कीच त्यांची आठवण येईल…
मैं शायर तो नहीं / चित्रपट : बॉबी
हम तुम एक कमरे में बंद हो / चित्रपट : बॉबी
एक हसीना थी / चित्रपट : कर्ज
चाँदनी चांदनी ओ मेरी चांदनी / चित्रपट : चांदनी
सोचेंगे तुम्हें प्यार करें के नहीं / चित्रपट : दिवाना