मुंबई – अभिनेत्री सई ताम्हणकरने मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने तिने सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतेच सईने अवधूत गुप्तेच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात तिने सिनेसृष्टीतील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. यावेळी सईने सिनेसृष्टीतील महिला आणि पुरुषांबद्दल केल्या जाणाऱ्या भेदभावाबद्दल वक्तव्य केले आहे.
यावेळी सईला अवधूत गुप्तेने मराठी चित्रपट क्षेत्रात पुरुषांना जशी वागणूक दिली जाते, तशी स्त्रियांना दिली जात नाही, याबद्दल विचारले होते. त्यावर तिने ‘पुरुषांचं यश स्त्रियांच्या तुलनेत जास्त चांगल्या पद्धतीने साजरे केले जाते. समान वेतन वगैरे या खूप दूरच्या गोष्टी आहेत. त्या तर अजून सिनेसृष्टीत घडलेल्याच नाहीत,’ असे स्पष्ट मत दिले. तिच्या या उत्तराने सर्वचजण अचंबित झाले. सध्या सईचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
दरम्यान, मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि हॉट अभिनेत्री म्हणून सध्या ‘सई ताम्हणकर’कडे पाहिलं जातं. सई ताम्हणकर लवकरच ‘कलरफुल’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत असणार आहे. नुकतेच सईने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या शूटिंगला सुरुवात केली असून यात ती परिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.