वॉशिंग्टन – करोनाच्या साथीने जगभरात थैमान घातले आहे. याचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. आता व्हाईट हाऊसने वॉशिंग्टनमधील गरजू नागरिकांच्या जेवणाची जबाबदारी अमेरिकेच्या प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांच्याकडे आहे. या संकटाच्या काळात पहिल्यांदाच मेलानिया ट्रम्प यांनी सार्वजनिक ठिकाणी स्वतः लोकांपर्यंत जेवण पोहोचवले.
मेलानिया ट्रम्प अनेकदा आपले युवा कल्याण अभियान बी बेस्टच्या प्रचारासाठी शाळा, हॉस्पिटल आणि इतर ठिकाणी जात असे. मात्र, आता शाळा बंद असल्याने मेलानिया ट्रम्प यांनी प्रेरणा देण्यासाठी व्हाईट हाऊसच्या किचनची जबाबदारी स्वीकारली आहे.
मागील आठवड्यात मेलानिया यांनी कोलंबियाच्या अग्निशमन आणि इमर्जेन्सी मेडिकल सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली होती. यावेळी त्या आपल्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये तयार केलेले जेवण, मोठ्या बॅग्स, फेस मास्क आणि हॅंड सॅनिटायझर घेऊन गेल्या होत्या. त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचीदेखील भेट घेतली.
मेलानिया ट्रम्प यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क लावण्याचे लोकांना आवाहन केले आहे. सोबतच व्हाईट हाऊसच्या कर्मचाऱ्यांना 150 जेवणाचे डब्बे पाठविण्यासदेखील सांगितले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ येथे हे जेवण पाठविण्यात आले.