पुणे – दीवंगत माजी क्रीडा प्रबोधिनीला विजेतेपद ऑलिम्पियन बाबु निमल यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेहफील करंडक हॉकी स्पर्धेत बालेवाडी क्रीडा प्रबोधिनी संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम लढतीत त्यांनी पुण्याच्या आयकर विभागावर 6-1 असा दणदणीत विजय प्राप्त केला.
क्रीडा प्रबोधिनीकडून व्यंकटेश केंचीने 5 व्या. प्रज्वल मोहोळकरने 10 व्या. रोहन पाटीलने 37 व 41 व्या,रईस मुजावरने 48 व्या तर, सागर शिंगाडेने 57 व्या मिनिटाला गोल केले. आयकर विभागाकडून आशितोष लिंगेशने 29 व्या मिनिटाला केला.
तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत चा सामना रोवर्स अकादमीने रेल्वे पोलीस लाईन बॉईजवर पेनल्टी शुटआऊटमध्ये 5-4 असा विजय मिळवला. पूर्ण वेळेत हा सामना 4-4 असा बरोबरीत सुटला होता.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धा संचालक श्रीधरन तंबा, माजी राष्ट्रीय खेळाडू रमेश पिल्ले, हॉकी महाराष्ट्राचे सचिव मनोज मोरे, स्टॅनली डीसुझा व दीवंगात बाबु निमल यांच्या परिवाताली सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पूजा चिन्मय कोरड व चिन्मय कोरड यांनी केले.