मेगा रिटेल लोन एक्‍स्पोचे आयोजन ! महाराष्ट्र बॅंकेच्या वतीने पुढाकार ; 100 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्टय

पुणे – बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने मेगा रिटेल लोन एक्‍स्पोचे आयोजन गुरुवार 11 फेब्रुवारी 2021 रोजी चंद्रशेखर आगाशे महाविद्यालय मैदान येथे सकाळी 10 ते सायं 5 या वेळेत करण्यात आले असल्याची माहिती बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या पुणे शहर क्षेत्रीय प्रबंधक व्ही. पी. श्रीवास्तव यांनी दिली.

कोरोना काळानंतर जनजीवन पुन्हा एकदा सुरळीत होत आहे. व्यावसायिकदृष्टया सक्षम होण्यासाठी बॅंक ऑफ महाराष्ट्र नेहमीच विविध उपक्रमांचे आयोजन करत असते. याच उद्देश्‍याने बॅंक ऑफ महराष्ट्रच्या पुणे पूर्व, पश्‍चिम व शहर विभागांच्या वतीने एकत्रित या मेगा रिटेल लोन एक्‍स्पोचे आयोजन करण्यात आले आहे.

या एक्‍स्पोचे उदघाटन बॅंक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक ए. एस. राजीव यांच्या हस्ते करण्यात येणार असून यावेळी बॅंकेचे कार्यकारी संचालक हेमंत टम्टा, पुणे शहर प्रबंधक व्ही. पी श्रीवास्तव, पुणे पूर्व क्षेत्रीय प्रबंधक वीणा राव, पुणे पश्‍चिम क्षेत्रीय प्रबंधक प्रशांत दास, रिटेलचे महाप्रबंधक यु आर राव आदी उपस्थित राहणार आहेत.

व्ही. पी. श्रीवास्तव म्हणाले की, बांधकाम, ऑटोमोबाईल, शिक्षण, सोने तारण, तसेच विमा क्षेत्रातील अनेक दिग्गज कंपन्या या एस्क्‍पोमध्ये सहभागी होणार आहेत. ग्राहकांना मोठ्या प्रमाणात विकल्प उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे ग्राहक या एक्‍स्पोद्वारे मोठ्या प्रमाणात खरेदी करू शकतील. या एक्‍स्पोद्वारे किमान 100 कोटी रुपयांची कर्ज मंजुरी व वाटप करण्याचे बॅंक ऑफ महाराष्ट्रचे उद्दिष्टय आहे.

पतधोरणामध्ये व्याज दरांत कोणताही बदल करण्यात आला नाही. आकर्षक व्याजदराने ग्राहकांना घर किंवा कार खरेदी करता येणार असल्याची माहिती यावेळी श्रीवास्तव यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.