‘कॅन्सर डे’च्या निमित्ताने लोकमान्य सोसायटीतर्फे डॉक्‍टरांचा सन्मान

पुणे – फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात साजरा करण्यात येणाऱ्या ‘कॅन्सर डे’च्या निमित्ताने ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लि’तर्फे कॅन्सर विशेषज्ञ डॉक्‍टरांचा आदर सत्कार करण्यात आला.

कॅन्सर रोगाप्रती जनजागृती म्हणून फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच 4 फेब्रुवारी हा दिवस ‘कॅन्सर डे’ म्हणून जगभर पाळला जातो. या दिनाचे औचित्य साधून ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लि’च्या विविध शाखांच्या माध्यमातून शाखानिहाय परिसर व उपनगरांतील कॅन्सर विशेषज्ञ डॉक्‍टरांचा सत्कार करण्यात आला.

यामध्ये डॉ. ए. व्ही. कुलकर्णी, डॉ. जगदीश शिंदे, डॉ. राहूल कुलकर्णी, डॉ. शामकांत दिघे, डॉ. पूनम गावंडे, डॉ. बहार कुलकर्णी, डॉ. हर्षल पडावी, डॉ.जयसिंग शिंदे, डॉ. सुबोध पंडित, डॉ. अश्विन राजभोग या व पुणे महानगरातील पन्नासहून अधिक मान्यवर कॅन्सर तज्ञांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

कॅन्सर या भयंकर रोगाप्रती निष्ठेने डॉक्‍टरवर्ग रूग्णसेवा करत आलेले आहेत. समाज म्हणून आपण ही त्यांच्याविषयीच्या कृतज्ञतेच्या भावनेने त्यांचे आभार व्यक्त करणे आपले कर्तव्य आहे. समाजभावनेची ही बाब लक्षात घेऊन आम्ही दरवर्षी अशा कार्यक्रमांचे आयोजन करतो. यामागे लोकांमध्ये कॅन्सरविषयी जनजागृतीचा घडवून आणणे हा उद्देशही असतो अशी माहिती लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लि’च्या पुणे विभागीय कार्यालयाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. सुशील जाधव यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.