मेरठ – उत्तर प्रदेशात मेरठजवळील कैथवाडा गावातील एका साधूची अज्ञात इसमांच्या जमावाकडून बेदम मारहाण करून हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणातील संबंधितांवर कडक कारवाई करा, अशी मागणी करीत दुसऱ्या एका जमावाने जोरदार निदर्शने केल्याने त्या भागात मोठा तणाव पसरला आहे.
या साधूचे प्रेत रस्त्यावर ठेवून निदर्शने करण्यात आली. पोलिसांना त्यावेळी हस्तक्षेप करावा लागला. या साधूचे नाव चंद्रपाल ऊर्फ सुख्खी असे होते. बडला गावातील चामुंडा देवीच्या मंदिराजवळ हे साधू राहात होते.
गेली बारा वर्षे ते मंदिरातील साधनेत लीन होते. त्यांचे स्थानिक लोकांशी भांडण होते असे सांगण्यात येत आहे. तथापि, त्याच वादातून त्यांची हत्या झाली असल्याचे अजून स्पष्ट झालेले नाही.