भवानीनगर – कन्हेरी (ता. बारामती) येथे शरयू फौंडेशन, ग्रामपंचायत, आरोग्य विभागाच्या वतीने डेंग्यू व तापसदृश्य आजारावर अगोदरची उपाययोजना म्हणून धूरळणी, कोरडा दिवस, याचबरोबर टॉयलेटमध्ये तयार होणाऱ्या डासांचा बंदोबस्त करण्यासाठी वेंट पाईपला जाळी बसवण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती सरपंच सतीश काटे यानी दिली. शुक्रवार (दि.3) योजनेस सुरुवात करण्यात आली. ही योजना राबवणारे जिल्ह्यातील पहिले गाव आहे.
डेंग्यू व तापसदृश्य आजार हे पाण्यामधून तयार होणारे डासांपासून होत आहेत. यावर उपाय म्हणून कोरडा दिवस पाळणे हा उपाय आहे. आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणामध्ये निदर्शनास आले आहे. याबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांकडून जनजागृती करण्यात आली. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी वेंट पाईपला जाळी बसवली जात आहे.
ही योजना करण्यासाठी शरयू फौंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शरयू फौंडेशन ग्रुप, सरपंच सतीश काटे, उपसरपंच शेलार, काका देवकाते, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेविका पूनम गायकवाड, विनोद काळे, तरूण, ग्रामस्थांनी सहकार्य केले. यावेळी तालुका आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. खोमणे, डॉ. मार्तंड जोरी, सुनील जगताप, बाळासाहेब दळवी, श्रीराम पाटील यांनी मार्गदर्शन केले. योजनेची आखणी आरोग्य विभागाचे पुष्पराज निंबाळकर यांनी केली.