नगर – शहरातून जाणाऱ्या निंबळक बायपास रस्त्यावर शुक्रवारी (दि.3) रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मालट्रक उलटला. या घटनेमुळे सुमारे सहा तास वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
नगर-मनमाड रस्त्यासाठी पुण्याहून येणारी जड वाहतूक केडगावपासून या निंबळक बायपास रस्त्यावरुन वळविली आहे. या रस्त्यावर शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास खताच्या गोण्या वाहून नेणारा 16 टायरचा मालट्रक रस्त्याच्या मधोमध उलटला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. परंतु या रस्त्यावर सहा तास वाहतूक ठप्प झाल्याने कल्याणरोडपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हा ट्रक मनमाडकडे राजस्थानला चालला होता. दोन क्रेनच्या साह्याने मालट्रक बाजूला करण्यात आला. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.